पुण्याच्या रस्त्यांवर तुळशीच्या रोपांचे वाटप, तुलसी पूजनाचे संदेश
पुणे – २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत व्यसनाधीनता आणि इतर गैरकृत्ये वाढतात, त्याला पर्याय म्हणून मानव कल्याणासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून वर्ष २०१४ पासून २५ डिसेंबर हा ‘तुलसी पूजन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या उपक्रमाचा प्रसार व्हावा, यासाठी पुण्यात १८ डिसेंबर या दिवशी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून सारसबाग ते संभाजीबाग या मार्गावर ‘भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा’ काढण्यात आली. सफेद वस्त्रे आणि भगवी टोपी, उपरणी परिधान करून २ सहस्र अनुयायी यामध्ये सहभागी झाले होते. तुलसी पूजनाचे, तुलसी महात्म्य सांगणारे फलक त्यांनी हाती घेतले होते. आसाराम बापूंच्या छायाचित्रांचे रथही यामध्ये सामील झाले होते. यात्रेमध्ये तुळशीच्या रोपांचे आणि तुलसी पूजन दिवसाचे संदेश असलेली पत्रके वाटण्यात आली.
या कालावधीत तुलसी पूजन, जपमाळ पठण, गोपूजन, हवन, गौ-गीता-गंगा जागृती, सत्संग आदी उपक्रम आयोजित केले जावेत, असा अनुयायांचा प्रयत्न आहे, अशी माहिती देण्यात आली.