नराधम ‘लव्ह जिहादीं’ना फासावर लटकवा ! – तासगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा !

आंदोलनात मनोगत व्यक्त करतांना सौ. विद्या सादुल

तासगाव (जिल्हा सांगली) – नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी १९ डिसेंबरला बागणे चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि रणरागिणी शाखेच्या सौ. विद्या सादुल यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.

आंदोलनप्रसंगी उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ

या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सिद्धेश्वर लांब आणि श्री. आकाश पाटील, भाजपचे श्री. संदीप सावंत, राष्ट्रसेविका समितीच्या श्रीमती अनुराधा मोडक, भाजपचे कार्यकर्ते श्री. प्रताप माळी यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन झाल्यावर भाजपचे माजी नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विषय जाणून घेतला आणि निवेदनावर स्वाक्षरी केली.