काशी आणि तमिळनाडू येथील लोकांचा डी.एन्.ए. एकच ! – संशोधकांचा निष्कर्ष

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाने केलेल्या संशोधनामध्ये काशी आणि तमिळनाडू येथील लोकांचा डी.एन्.ए. एकच आहे. तसेच या सर्वांचे पूर्वज एकच होते, असे समोर आले आहे. या संशोधनात विविध विश्‍वविद्यालये आणि महाविद्यालये येथील ७५ संशोधक काम करत आहेत. भाग्यनगर येथील आण्विक जीव विज्ञान केंद्र आणि बनारस हिंदु विश्‍वविद्यालय याचे नेतृत्व करत आहेत.

 (सौजन्य : StudyIQ IAS हिंदी)

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील जंतू विज्ञान विभागाचे प्राध्यापक ज्ञानेश्‍वर चौबे

या संदर्भातील संशोधनाचे प्रमुख असणारे बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील जंतू विज्ञान विभागाचे प्राध्यापक ज्ञानेश्‍वर चौबे यांनी सांगितले की, हे संशोधन वर्ष २००६ पासून चालू आहे. आतापर्यंत ३५ सहस्र नमुने गोळा करण्यात आले असून १ लाख नमुने गोळा करण्यात येणार आहेत. याद्वारे ‘भारतातील विविध जाती आणि जमाती यांच्यात किती साम्य आहे’, हे शोधण्यात येत आहे. याद्वारे काशीतील १००, तर तमिळनाडूतील २०० लोकांचे नमुने घेण्यात आले होते. त्यांच्या संशोधनातून लक्षात आले की, दोघांचाही डी.एन्.ए. एकच आहे. तसेच अशा संशोधनाचा गुन्हेगारांना पकडण्यासही लाभ होणार आहे.

संपादकीय भूमिका

स्वतःला ‘द्रविड’ मानून देशातील अन्य हिंदूंपासून स्वतःला वेगळे समजणार्‍या तमिळनाडूतील हिंदुद्रोह्यांना चपराक !