हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच मिळणार हिंदूंना आधार !

‘पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कुणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जत तालुक्यातील गावांसाठी महत्त्वाची विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. उपसा सिंचन योजना आणि गावांतील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी कार्यवाही करावी.

श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात पालट करण्याची पुणे विद्यापिठाची भूमिका !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील ‘श्री गणेश अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमावर टीका झाल्याने अभ्यासक्रमात पालट करण्याची भूमिका विद्यापिठाने घेतली आहे.

महाराष्ट्रातील ४ महानगरांमध्ये ‘जी २०’ परिषदेच्या १४ बैठका होणार !

‘जी २०’ परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार असून त्यांतील १४ बैठका महाराष्ट्रात होणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होतील.

धर्म वाचवण्याकरिता तरी किमान सर्वांनी एकत्र येणे आवश्यक ! – ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर)

शालेय जीवनामध्ये मुले मैदानी खेळ, स्पर्धा विसरले आहेत. ते अधिकाधिक वेळ भ्रमणभाषचा वापर करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे भावी पिढी बरबाद होत असून शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही भ्रमणभाष वापरण्यावर बंदी करावी.

लोकलमध्ये महिलेचे छायाचित्र काढणार्‍या धर्मांधाला अटक !

नेरूळ ते वडाळा लोकलगाडीने प्रवास करतांना महिलेचे छायाचित्र काढणार्‍या धर्मांधाला प्रवाशांनी चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी वाशी लोहमार्ग पोलिसांनी फरीद असगर अली अन्सारी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.

कर्नाटकच्या नेत्यांना मुंबई आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो; पण तसे करणार नाही ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

कर्नाटककडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करतात ? आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबई आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो; पण आम्ही तसे करणार नाही.

तेलंगाणाच्या धर्तीवर विकास करा किंवा तेलंगाणात जाऊ द्या ! – सीमावर्ती गावकर्‍यांची मागणी

आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेत राज्याविषयी स्वाभिमान निर्माण न केल्याचा परिणाम !

भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांततेसाठी अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाविषयी माघार नाही ! – चंद्रकांत पाटील

एका गल्लीत चार-चार गणपति मंडळे हवीत; मात्र त्यांचा शास्त्रीय अभ्यासक्रम का नको ? अथर्वशीर्ष अभ्यासक्रम हा शास्त्रीय अध्ययनाचा भाग असून केवळ राजकारण म्हणून विरोध नको. भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांतता महत्त्वाची आहे.