कणकवली येथे बालगोपाळ हनुमान मंदिरातील दानपेटी फोडणार्‍याला नागरिकांनी रंगेहात पकडले

शहरात २ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजता परमहंस भालचंद्र महाराज संस्थान नजीक असलेल्या बालगोपाळ हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरणार्‍याला येथील नागरिकांनी रंगेहात पकडले. या चोरासमवेत अन्य एक तरुण होता; मात्र तो साथीदाराला पकडल्याचे पाहून पसार झाला.

फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ !

दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांच्या धुरामुळे हवेचा दर्जा खालावला असून त्यामुळे अनेक श्वसनाच्या विकारांना निमंत्रण मिळाले आहे. जंतूंचा संसर्ग, खोकला, दमा आदी आजारांचे रुग्ण वाढल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे.

सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथे ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियाना’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

हिंदु राष्ट्र स्थापनेचे मूळ समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेल्या बलोपासनेत आहे. मन, मेंदू आणि मनगट मजबूत करण्यासाठी बलोपासना आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी गावोगावी हनुमंताच्या मंदिरांची उभारणी केली.

सरकारी कर्मचार्‍यांनी त्रास दिल्यास व्हॉट्सॲपवर तक्रार करा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

कनिष्ठ पातळीवरील कर्मचार्‍याने जर त्यांचे काम चोख बजावले, तर ९९ टक्के प्रकरणे वरिष्ठांपर्यंत पोचणारच नाही, तसेच मंत्री किंवा आमदार यांच्यापर्यंत तक्रार करण्यास वाव रहाणार नाही. काही अधिकार्‍यांकडे निर्णयक्षमता नसते. धारिका प्रलंबित राहून सरकारची हानी होते.’’

किनार्‍यांवर अनधिकृत कृत्ये करणार्‍यांना कोठडीत टाकण्याचे पोलिसांना अधिकार ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

पर्यटन खात्याने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार फौजदारी दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत पोलीस अधिकारी नियमांचे उल्लंघन करणार्‍याला कोठडीत टाकू शकणार आहेत, अशी चेतावणी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.

हिंदूंनो, हलाल उत्पादने देशातून हद्दपार करण्यासाठी संघटित व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त पुणे जिल्ह्यातील भोर आणि मंचर येथे वर्धापनदिनाचे आयोजन

शासकीय अनास्थेमुळे रायगडावरील पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानाचे नूतनीकरण रखडले ! – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

स्वराज्याची राजधानी रायगड येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानाचे नूतनीकरण वर्ष २०१७ पासून रखडले आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या पावणेचार वर्षांपासून या निवासस्थानाच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे.

स्वतंत्र भारतातील सैनिकांचे पारतंत्र्य !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते, ‘‘भारत पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांपर्यंत पोचल्यानंतरच काश्मीरच्या संपूर्ण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल.

नाशिक येथे एका महिलेच्या मध्यस्थीने ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना मंडळ अधिकार्‍याला अटक !

येथील मंडळ कार्यालयात दिलेला अर्जाचा निकाल देण्यासाठी १ लाखांच्या लाचेची मागणी करत ५० सहस्रांची लाच एका महिलेच्या माध्यमातून स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

दिवाळीत पुणे येथे ८ दिवसांत १२ घरफोड्यांच्या घटना, अद्याप एकाही चोरास अटक नाही !

एकाही चोरास अटक न होणे, हे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पहावे, असेच जनतेला वाटते !