नाशिक येथे एका महिलेच्या मध्यस्थीने ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना मंडळ अधिकार्‍याला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील मंडळ कार्यालयात दिलेला अर्जाचा निकाल देण्यासाठी १ लाखांच्या लाचेची मागणी करत ५० सहस्रांची लाच एका महिलेच्या माध्यमातून स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. लाचखोर मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पराडकर आणि केतकी चाटोरकर या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून येथे लाचखोर प्रतिबंध सप्ताह चालू आहे. या कालावधीत जनजागृती होण्याच्या दृष्टीने पथकाने पत्रकांचे वाटप केले; मात्र त्यानंतरही काही अधिकार्‍यांनी लाच घेतली. (जनजागृतीचाही परिणाम होत नसल्यानेच कठोरात कठोर शिक्षेची अपरिहार्यता यावरून अधोरेखित होते ! – संपादक)