हिंदूंनो, हलाल उत्पादने देशातून हद्दपार करण्यासाठी संघटित व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त पुणे जिल्ह्यातील भोर आणि मंचर येथे वर्धापनदिनाचे आयोजन

श्री. सुनील घनवट

भोर (जिल्हा पुणे) – आज संपूर्ण देशामध्ये हलाल जिहादच्या माध्यमातून समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. तरी सर्व हिंदूंनी हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकून हलाल जिहाद आणि उत्पादने ही देशातून हद्दपार करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. तसेच लव्ह जिहाद, गोहत्या, वक्फ बोर्ड कायदा, धर्मांतर असे हिंदु धर्मावर होणारे आघात रोखायला हवेत. हिंदु धर्माचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील होऊन प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. भोर येथील श्रीमंत सौ. गंगूताई पंतसचिव वाचनालय सभागृह येथे समितीचा द्विदशकपूर्तीनिमित्त वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याचा प्रारंभ शंखनादाने झाला. श्री. सुनील घनवट आणि ह.भ.प. संजय महाराज खुटवड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

भोर येथील धर्मप्रेमी घोषणा देतांना

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रा.स्व. संघ, भोर व्यापारी संघटना, योग वेदांत सेवा समिती, प्रतापगड उत्सव समिती आदी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांच्यासह १२५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा केली.

समितीच्या मार्गदर्शनानुसार सर्व हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणाचे कार्य करावे ! – ह.भ.प. संजय खुटवड महाराज

आज हिंदू अनेक जातीपातींमध्ये विभागला गेला आहे. त्यांना संघटित करण्याचे आणि धर्मरक्षणाचे कार्य हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे अविरतपणे करत आहे. समितीच्या मार्गदर्शनानुसार आणि संतांच्या आशीर्वादाने सर्व हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणासाठी कार्य करावे.

मंचर

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात आपणही सहभागी झाले पाहिजे ! – संतोष गावडे, माजी सरपंच, गावडेवाडी

मंचर येथील कार्यक्रमानंतर धर्मप्रेमींशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट आणि अन्य मान्यवर

हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे धर्मशिक्षण, आपत्काळात येणारी संकटे आणि आघात यांविषयी मार्गदर्शन करत आहे. कोणतीही अपेक्षा न बाळगता समितीचे कार्यकर्ते कार्य करत आहेत. आपणही या कार्यात सहभागी झाले पाहिजे. मला जेव्हा देशी गायीचे महत्त्व कळले, तेव्हा मी गोशाळा चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येत्या काही दिवसांत आम्ही गोशाळा चालू करत आहोत. गाय आपली माताच आहे. त्यामुळे तिच्या रक्षणासाठी आपण उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन गावडेवाडीचे माजी सरपंच श्री. संतोष गावडे यांनी केले. मंचर येथे समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. धर्माचार्य अधिवक्ता शंकर महाराज शेवाळे, तसेच समितीचे सर्वश्री सुनील घनवट आणि दिलीप शेटे हेही उपस्थित होते. श्री. सुनील घनवट यांनी हलाल अर्थव्यवस्था, हलाल जिहाद आणि अन्य जिहाद यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

डावीकडून पहिले श्री. दिलीप शेटे, गावडेवाडीचे माजी सरपंच श्री. संतोष गावडे (मध्यभागी), श्री. सुनील घनवट

ह.भ.प. धर्माचार्य अधिवक्ता शंकर महाराज शेवाळे म्हणाले की, संतांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात आमूलाग्र पालट होतो. आज आपण संघटित होऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. हलाल उत्पादन सक्तीविरोधात कृती समिती स्थापणे आणि हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देणे या कृतींमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.२. ह.भ.प. अधिवक्ता राहुल पारठे महाराज यांनी समितीच्या संपर्कात आल्यावर ‘१० हत्तीचे बळ मिळाल्यासारखे वाटत आहे’, अशी प्रतिक्रिया दिली.३. या वेळी लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक जणांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ हे ग्रंथ घेतले.

विशेष सहकार्य

१. श्रीमंत सौ. गंगूताई पंतसचिव वाचनालय व्यवस्थापक समितीने सोहळा घेण्यासाठी सभागृह उपलब्ध करून दिले.

२. हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण अंबिके यांनी बैठकीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध केले.

३. उत्रोली येथील सरस्वती मंगल कार्यालयाचे मालक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. विठ्ठल यादवराव यादव यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा, तर धर्मप्रेमी श्री. सुनील सावंत यांनी विद्युत्जनित्र उपलब्ध करून दिले.

४. धर्मप्रेमी आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. राहुल शेटे यांनी चहाची, तर श्री. दिनेश काटकर यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध केली.

५. हिंदुत्वनिष्ठ श्री. तुषार वरे यांनी कार्यक्रमाचे साहित्य ने-आण करण्यासाठी स्वतःचे वाहन उपलब्ध करून दिले.