हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावी !

कराड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी !

‘डॉमिनोज’चे व्यवस्थापक महेश शिंदे यांना निवेदन देतांना उपस्थित समितीचे कार्यकर्ते

कराड, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्यात येऊन ‘ज्या संस्था ‘हलाल सर्टिफिकेशन’ देतात, त्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला आहे का ? याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना ? याची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने कराड येथील तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून गोपाल वसु यांना देण्यात आले.

‘डी मार्ट’चे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करताना समितीचे कार्यकर्ते

हिंदु समाजातील ग्राहकांना सक्तीने ‘हलाल प्रमाणित’ खाद्यपदार्थ दिले जाऊ नयेत, त्यांना हलाल प्रमाणित नसलेले खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात यावे. याविषयीचे निवेदन कराड येथील ‘डी मार्ट’चे व्यवस्थापक शोभराज मालगे, तसेच ‘डोमिनोज’चे व्यवस्थापक महेश शिंदे यांना देण्यात आले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकांशी हलाल प्रमाणित वस्तूंविषयी चर्चा करून प्रबोधन केले.

निवेदन स्वीकारताना तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून गोपाल वसु (डावीकडून सातवे) सोबत विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कराड आणि पाटण तालुक्याचे कार्यवाहक सर्वश्री सागर आमले, सत्येंद्र जाधव, धर्मजागरण समन्वयक श्री. गणेश महामुनी, गोरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पावसकर, श्री. पप्पू कुष्टे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलकापूर येथील श्री. दादासौ शिंगण, सनातन संस्थेचे सर्वश्री लक्ष्मण पवार, बाबूराव पालेकर, चिंतामणी पारखे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मनोहर जाधव, अरुण जाधव, अनिल कडणे, चेतन देसाई आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.