भारतासह जगभरात दिसले खंडग्रास सूर्यग्रहण

नवी देहली – वर्ष २०२२ मधील शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर या दिवशी भारताचा काही भाग वगळता सर्वत्र पहाता आले. खंडग्रास असणार्‍या या ग्रहणाचे वेध पहाटे साडेतीन वाजल्यापासून लागले होते. दुपारी ४.१९ पासून ते देशातील विविध ठिकाणी दिसू लागले. सायंकाळी ६.१५ पर्यंत ते वेगवेगळ्या भागातून पहाता आले. बहुतेक ठिकाणी सूर्यास्तानंतर ग्रहण संपले. भारतात अनेक मोठी मंदिरे या काळात बंद ठेवण्यात आली होती. हे खंडग्रास सूर्यग्रहण युरोप, उत्तर-पूर्व आफ्रिका, मध्य पूर्व, तसेच पश्‍चिम आशिया येथे दिसले. आता दीपावली आणि सूर्यग्रहण असा योग ३ नोव्हेंबर २०३२ या दिवशी येणार आहे. सूर्यग्रहणानंतर ८ नोव्हेंबरला पूर्ण चंद्रग्रहणही होणार आहे. ते आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, अमेरिका, तसेच भारतातही पहाता येणार आहे.