युक्रेनमधील भारतियांनी तातडीने देश सोडावा ! – भारत सरकारचा सल्ला

नवी देहली – जे भारतीय नागरिक युक्रेनमध्ये असतील त्यांनी तातडीने युक्रेन सोडावे, असा सल्ला भारतीय दूतावासाने दिला आहे. दुसर्‍यांदा अशा प्रकारचा सल्ला देण्यात आला आहे. युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती आणि नुकतेच झालेली आक्रमणे पहाता भारतीय दूतावासाने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यात भारतियांना उद्देशून म्हटले आहे की, हंगेरी, सोल्वाकिया, मोल्डोवा, पोलंड, रोमानिया यांसारख्या सीमेवरील देशांच्या साहाय्याने युक्रेनमधून बाहेर पडू शकता.

भारतीय नागरिकांच्या साहाय्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही प्रसारित

भारतीय नागरिकांच्या साहाय्यासाठी दूतावासाकडून +३८०९३३५५९९५८, +३८०६३५९१७८८१ आणि + ३८०६७८७४५९४५ हे ३ हेल्पलाईन क्रमांकही प्रसारित करण्यात आले आहेत.