बांगलादेशमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून श्री काली मंदिरावर आक्रमण

बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

आतंकवाद्यांकडून श्री काली मंदिरावर आक्रमण

ढाका – बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यामधील गोविंदपूर येथील श्री काली मंदिरावर जिहादी आतंकवाद्यांनी नुकतेच आक्रमण केले. या आक्रमणात जिहाद्यांनी मंदिराची तोडफोड केली.

या आक्रमणात स्थानिक जिहादी तुशर इस्लाम आणि त्याचे मित्र यांचा सहभाग होता. याविषयीची माहिती ‘व्हॉइस ऑफ हिंदूज’ने टि्वटरवर प्रसारित केली आहे.

या प्रकरणी तुषार इस्लाम, बेलाल उद्दीन, रॉकी अहमद आणि असदुज्जमन या चौघांना अटक करण्यात आली आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक