मुंबई – ‘व्हॉट्स ॲप’ची जगभरातील सेवा २५ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२.३० ते २.३० या कालावधीत ठप्प झाली. ‘व्हॉट्स ॲप’ चालवणार्या अमेरिकेतील ‘मेटा’ या आस्थापनाकडून सेवा कोणत्या कारणामुळे खंडित झाली, याविषयी अधिकृतरित्या कळवण्यात आलेले नाही.
#BreakingNow: करीब 2 घंटे बाद #WhatsApp की सेवाएं बहाल हुईं, कई यूजर्स का दावा- ‘सर्विस धीमी है’ @PreetiNegi_ #WhatsApp #WhatsAppDown #Meta #WhatsappIndia pic.twitter.com/ragi8GAT5n
— Times Now Navbharat (@TNNavbharat) October 25, 2022
‘व्हॉट्स ॲप’ची सेवा अचानकपणे खंडित झाल्यामुळे वापरकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काहींचे आर्थिक व्यवहार बंद पडल्याने हानी झाली, तर काहींचे महत्त्वाचे निरोप पोचू न शकल्याने अडचणी आल्या. आरोग्याशी संबंधित सेवांमध्येही अडचणी आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. कार्यालयीन कामकाजामध्ये यामुळे व्यत्यय येऊन वापरकर्त्यांना पर्यांयी माध्यमांचा उपयोग करावा लागला. ‘व्हॉट्स ॲप’ची सेवा ठप्प झाल्याविषयी अनेक वापरकर्त्यांनी अन्य सामाजिक प्रसारमाध्यमांवरून असंतोष व्यक्त केला. याविषयी ‘टिवटर’वर ‘#WhatsAppDown’ हा ट्रेंडही चालू करण्यात आला. वर्ष २०२१ मध्ये तांत्रिक अडचणींमुळे ‘व्हॉट्स ॲप’ची सेवा काही काळ ठप्प झाली होती.