पाकिस्तानच्या आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यास चीनचा पुन्हा विरोध !
चीनच्या अशा कारवायांना जगातील सर्व देशांनी संघटितपणे विरोध करणे आवश्यक !
चीनच्या अशा कारवायांना जगातील सर्व देशांनी संघटितपणे विरोध करणे आवश्यक !
राजस्थान येथे कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणातही अजमेर दर्ग्याच्या एका सेवकाला अटक करण्यात आली होती. एकूणच या दर्ग्याचा कुणाकुणाशी संबंध आहे, हे लक्षात घेता तेथील सर्वांची कसून चौकशी करायला हवी !
दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ
दगड आणि पेट्रोल बाँब फेकले !
शिवमोग्गा येथे मुसलमान आणि हिंदु गटांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. शिवमोग्गा येथील सय्यद परवेज नावाच्या मुसलमान व्यक्तीच्या ‘इनोव्हा’ चारचाकी गाडीची हानी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे.
‘लॉरिअल’ या अमेरिकेतील सौंदर्यप्रसाधने बनवणार्या आस्थापनाच्या ‘हेअर स्ट्रेटनिंग’ (केस सरळ करणार्या) उत्पादनामुळे कर्करोग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दावा करणार्या जेनी मिशेल नावाच्या महिलेने हानीभरपाईसाठी अमेरिकेच्या शिकागो येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ‘आतंकवाद प्रतिबंधक समिती’ची महत्त्वाची बैठक २८ आणि २९ ऑक्टोबर या दिवशी भारतात होत आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत, तर २९ ऑक्टोबरला देहलीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.
मिसौरी येथील सेंट ल्युईस हायस्कूलमध्ये अज्ञाताने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू, तर ६ जण घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला.
म्यानमारमधील सैन्याने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ६० जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. कचीन या मूळनिवासी अल्पसंख्य समुदायाच्या प्रमुख राजकीय संघटनेच्या वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या लोकांवर हे आक्रमण करण्यात आले.
रामनगर येथील केम्पापुरा गावामधील श्री कंचुगल बंदे मठाचे मुख्य पुजारी बसवलिंगा स्वामी (वय ४५ वर्षे) यांनी गळफास लावून आत्महत्या केली.