शिवमोग्गा (कर्नाटक) येथे दोन गटांमध्ये तणाव : पोलिसांकडून तक्रार नोंद

शिवमोग्गा (कर्नाटक) – शिवमोग्गा येथे मुसलमान आणि हिंदु गटांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. शिवमोग्गा येथील सय्यद परवेज नावाच्या मुसलमान व्यक्तीच्या ‘इनोव्हा’ चारचाकी गाडीची हानी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर दुचाकीस्वार मुसलमान आक्रमणकर्त्यांनी बजरंग दल नेता हर्ष यांच्या घरावर चाकू, कुर्‍हाडी आणि इतर घातक शस्त्रे यांसह आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दगडफेकही केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांच्या विरोधात तक्रार नोंदवली असून अन्वेषण चालू केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार २२ ऑक्टोबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी एक मोर्चा काढला होता. या मोर्च्यामध्ये बजरंग दलाचे दिवंगत नेते हर्ष यांची बहीण अश्‍विनी सहभागी झाली होती. या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडीची हानी केल्याचा आरोप आहे. प्रकाश नावाच्या एका हिंदुत्वनिष्ठाने जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर आक्रमण करण्यात आले. घायाळ प्रकाश यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. शिवमोग्गा येथील परिस्थिती तणावपूर्ण असली, तरी नियंत्रणाखाली आहे, असे शिवमोग्गाचे पोलीस अधीक्षक मिथुन नाईक यांनी सांगितले. (गुंड वृत्तीच्या धर्मांधांना रोखण्यासाठी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे ! – संपादक)