न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्राने ‘लष्कर-ए-तोयबा’चा प्रमुख हाफिज सईद याचा मुलगा तलहा सईद याचे नाव आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणून घोषित करण्याच्या सूचीमध्ये घातले होते; मात्र चीनने या सूचीला विरोध केला. आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये सईदचे नाव निश्चित करण्याचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्राला दिला होता. यापूर्वी चीनने लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी शाहिद महमूद यालाही ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता.
भारताच्या गृह मंत्रालयाने ८ एप्रिल या दिवशी जारी केलेल्या अधिसूचनेत तलहा सईद याला आतंकवादी घोषित केले होते. त्यात नमूद केले होते की, तलहा सईद हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आतंकवादी असून मौलवी शाखेचा प्रमुख आहे. सईदचा आतंकवाद्यांच्या भरतीत आणि निधी संकलनात सक्रीय सहभाग आहे. भारतातील आणि अफगाणिस्तानातील भारताशी संबंधित ठिकाणी आक्रमण करण्याचा लष्कर-ए-तोयबाचा कट रचण्यात, तसेच तो प्रत्यक्षात घडवण्यात सईद याचा सहभाग आहे.
संपादकीय भूमिकाचीनच्या अशा कारवायांना जगातील सर्व देशांनी संघटितपणे विरोध करणे आवश्यक ! |