व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी साजरी केली दिवाळी !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्‍या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.

येथे दिवाळी निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जो बायडेन आणि कमला हॅरिस उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भारतीय नागरिक उपस्थित होते. ‘अंधारावर उजेडाने मात करणारा सण म्हणजे  दिवाळी होय’, असे सांगत कमला हॅरिस यांनी सर्व भारतियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बायडेन यांनीही भारतियांचे कौतुक करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी हॅरिस यांनी फटाकेही फोडले.