कर्नाटकमधील मठाच्या मुख्य पुजार्‍यांची आत्महत्या

पुजारी बसवलिंगा स्वामी

रामनगर (कर्नाटक) – येथील केम्पापुरा गावामधील श्री कंचुगल बंदे मठाचे मुख्य पुजारी बसवलिंगा स्वामी (वय ४५ वर्षे) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खोलीमध्ये एक चिठ्ठीही मिळाली आहे. याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिलेली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

१. रामनगरचे पोलीस अधीक्षक एस्.पी. संतोष बाबू यांनी म्हटले की, आम्ही आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंद केला आहे. त्या दृष्टीने अन्वेषण करत आहोत.

२. पोलिसांच्या सूत्रांनुसार काही समाजकंटक बसवलिंगा स्वामी यांना ब्लॅकमेल करत होते, असा संशय आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तीची, तसेच त्यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क करणार्‍यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे.