अमेरिकेतील शाळेत झालेल्या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू  

मिसौरी (अमेरिका) – येथील सेंट ल्युईस हायस्कूलमध्ये अज्ञाताने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू, तर ६ जण घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला. तो २० वर्षांचा होता. त्याची अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. या घटनेविषयी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

सकाळी ९ वाजता गोळीबार झाल्यानंतर विद्यार्थ्यांची पळापळ झाली. या वेळी त्यांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून खाली उड्या मारल्या. एका मुलीने सांगितले की, ती आक्रमणकर्त्यांच्या समोर आली होती; मात्र त्याची बंदूक अडकल्यामुळे ती पळून जाऊ शकली.