|
वडोदरा (गुजरात) – येथे २४ ऑक्टोबरच्या रात्री फटाके फोडण्यास धर्मांध मुसलमानांकडून विरोध करत हिंसाचार करण्यात आला. या वेळी पेट्रोल बाँब फेकण्यात आले. ही घटना येथील पानीघाटा परिसरातील मुस्लिम मेडिकल सेंटरजवळ झाली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १९ जणांना अटक केली आहे. एका रॉकेटमुळे दुचाकीला आग लागल्यातून वाद झाल्याने हा हिंसाचार झाला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या हिंसाचाराच्या वेळी रस्त्यावरील दिवे जाणीवपूर्वक बंद करण्यात आले होते. त्यामुळे हा हिंसाचार एक षड्यंत्र रचून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
गुजरात के वडोदरा में दो गुटों के बीच दिवाली की रात जमकर हिंसा हुई. #diwali #Gujarat https://t.co/LZIMxUizWI
— AajTak (@aajtak) October 25, 2022
येथे दीपावलीनिमित्त फटाके फोडण्यात येत होते. त्या वेळी धर्मांध मुसलमानांनी फटाके फोडणार्यांना तेथे फटाके न फोडण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्यात वाद झाला. दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने लोकांना गोळा करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी चालू झाली. त्यातून पुढे येथील दुकाने आणि वाहने यांना आग लावण्यात आली. दगडफेक आणि पेट्रोल बाँब फेकण्यात आले. पोलिसांवरही पेट्रोल बाँब फेकण्यात आले. या वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या हिंसाचारात जीवित हानी झाल्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. सध्या येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी येथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासत आहेत. सध्या दोन जणांना कह्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|