लॉरिअल’ची सौंदर्यप्रसाधने वापरल्याने गर्भाशयाचा कर्कराग झाल्याचा आरोप !

अमेरिकेत आस्थापनाच्या विरोधात खटला प्रविष्ट

शिकागो (अमेरिका) – ‘लॉरिअल’ या अमेरिकेतील सौंदर्यप्रसाधने बनवणार्‍या आस्थापनाच्या ‘हेअर स्ट्रेटनिंग’ (केस सरळ करणार्‍या) उत्पादनामुळे कर्करोग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दावा करणार्‍या जेनी मिशेल नावाच्या महिलेने हानीभरपाईसाठी अमेरिकेच्या शिकागो येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. मिशेल यांनी आरोप केला आहे की, त्यांनी २ दशकांहून अधिक काळ या आस्थापनाची उत्पादने वापरली होती. त्यानंतर त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला, ज्यामुळे त्यांना शस्त्रकर्म करून गर्भाशय काढावे लागले.

याचिका प्रविष्ट करतांना मिशेल यांनी एका अभ्यासाचा संदर्भ दिला आहे. ‘यूएस् नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सेफ्टी’च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, केस सरळ करणारी उत्पादने वारंवार वापरणार्‍यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढू शकतो. केसांशी संबंधित रासायनिक उत्पादनांमुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. हा अभ्यास प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी हा खटला प्रविष्ट करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार ज्या स्त्रियांनी रसायनयुक्त ‘हेअर प्रॉडक्ट्स’ वापरली, त्यांच्या तुलनेत ज्या स्त्रिया वर्षातून ४ वेळा ही उत्पादने वापरतात, त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता दुप्पट असते.