न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आक्रमण

न्यूयॉर्क येथे एका भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आकमण करण्यात आले. भरतभाई पटेल असे त्यांचे नाव असून ते येथे वस्तू वितरणाचे काम करतात.

विसर्जनानंतर देवतेच्या मूर्तीची छायाचित्रे काढून ती प्रसारित केल्यास कारवाई ! – मुंबई पोलीस

मुंबईचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी पत्रक काढून देवीच्या मूर्ती विसर्जनाच्या प्रसंगाचे छायाचित्र काढणे व प्रसारित करणे यांवर बंदी घातली आहे.

सरसंघचालकांना ‘राष्ट्रपिता’ संबोधणार्‍या इमामांना इंग्लंड आणि पाकिस्तान येथून शिरच्छेद करण्याच्या धमक्या  

याप्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर देहलीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘मी या धमक्यांना घाबरणार नाही किंवा झुकणार नाही’, असे इलियासी यांनी स्पष्ट केले आहे.  

आता ‘गूगल’वरून करता येणार संस्कृतचे भाषांतर !

संस्कृत भाषेच्या प्रसार आणि प्रचार यांसाठी ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’ने (‘आय.सी.सी.आर्.’ने) ‘गूगल’ या ‘सर्च इंजिन’ असणार्‍या संकेतस्थळाच्या आस्थापनाशी ‘सामंजस्य करार’ केला आहे.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवर पूर्वेकडे असणारी मीना मशीद हटवावी !  

मथुरा येथील मीना मशिदी तिच्या मूळ जागेवरून हटवण्यात यावी, यासाठी येथील दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, ही मशीद केशव देव मंदिराच्या जागेवर बांधण्यात आली आहे.

काबुलमधील शाळेत झालेल्या बाँबस्फोटात २४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

या स्फोटाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही. पश्‍चिम काबुलमधील दश्त-ए-बर्ची येथे एका शाळेत काही विद्यार्थी परीक्षेची सिद्धता करत होते. या वेळी मोठा स्फोट झाला.

केंद्र सरकारकडून ६७ अश्‍लील संकेतस्थळे बंद करण्याचा आदेश

वर्ष २०१५ मध्येही सरकारने अशाच पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ८८ पॉर्न संकेतस्थळांवर कारवाई केली होती.

कराचीमध्ये दातांच्या चिकित्सालयातील गोळीबारात १ चिनी ठार, तर ३ चिनी नागरिक घायाळ !

कराची येथे दाताच्या चिकित्सालयात एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात चिनी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य ३ चिनी नागरिक गंभीररित्या घायाळ झाले. या घटनेचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही.

रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.५० टक्क्यांनी वाढवला

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास पत्रकार परिषदेत व्याजदरांविषयी माहिती दिली. ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर ४.९० टक्क्यांवरून ५.४० टक्के करण्यात आले होता.

गदग (कर्नाटक) येथे सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांसाठी महंमद पैगंबरांवर निबंध स्पर्धा आयोजित करणारे मुसलमान मुख्याध्यापक निलंबित !

मुसलमान विद्यार्थ्यांसाठी कधी हिंदु मुख्याध्यापक श्रीराम, श्रीकृष्ण आदी हिंदूंच्या देवतांवर निबंध स्पर्धा घेण्याचे धाडस दाखवू शकतील का ? आणि दाखवलेच, तर त्यांची काय स्थिती होईल, हे वेगळे सांगायला नको !