गदग (कर्नाटक) येथे सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांसाठी महंमद पैगंबरांवर निबंध स्पर्धा आयोजित करणारे मुसलमान मुख्याध्यापक निलंबित !

गदग (कर्नाटक) – येथील नागावी भागातील एका सरकारी शाळेमध्ये महंमद पैगंबर यांच्यावर निबंध स्पर्धा आयोजित केल्यावरून शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मुनाफ बिजापुरा यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारकडून या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्याचा कोणताही आदेश देण्यात आलेला नव्हता; मात्र मुनाफ यांनी गोपनीय पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी यास विरोध केला होता. त्यानंतर प्रशासनाकडून वरील कारवाई करण्यात आली.

१. प्रशासनाने या सदंर्भात केलेल्या चौकशीत समोर आले की, मुनाफ यांनी शिक्षकांना न सांगता इयत्ता ८ वीच्या ४३ विद्यार्थ्यांना महंमद पैगंबर यांच्याविषयीचे एक पुस्तक देऊन निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यासाठी त्यांनी ५ सहस्र रुपयांचे बक्षिस घोषित केले होते.

२. एका विद्यार्थ्याचे पालक शरणप्पा गौडा हापलाद यांनी सांगितले की, अशा निबंध स्पर्धेद्वारे मुलांवर इस्लाम थोपण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्याध्यापक मुनाफ यांचा मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होता. यामुळे मी या घटनेची माहिती श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना दिली. पैगंबरांवर निबंध लिहिण्याची स्पर्धा घेण्यामागे काय उद्देश आहे, हे समजू इच्छित आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमान विद्यार्थ्यांसाठी कधी हिंदु मुख्याध्यापक श्रीराम, श्रीकृष्ण आदी हिंदूंच्या देवतांवर निबंध स्पर्धा घेण्याचे धाडस दाखवू शकतील का ? आणि दाखवलेच, तर त्यांची काय स्थिती होईल, हे वेगळे सांगायला नको !