न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आक्रमण

डावीकडे भरतभाई पटेल

न्यूयॉर्क (अमेरिका) – येथे एका भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. भरतभाई पटेल असे त्यांचे नाव असून ते येथे वस्तू वितरणाचे काम करतात. या प्रकरणी पोलिसांनी शॉन कूपर उपाख्य ‘सुपर पर्प’ याला अटक केली आहे. शॉन हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याने काहीही कारण नसतांना पटेल यांच्यावर आक्रमण केले.