काबुलमधील शाळेत झालेल्या बाँबस्फोटात २४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

काबुल (अफगाणिस्तान) – येथील एका शाळेत ३० सप्टेंबरच्या सकाळी झालेल्या बाँबस्फोटांत २४ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही.

पश्‍चिम काबुलमधील दश्त-ए-बर्ची येथे एका शाळेत काही विद्यार्थी परीक्षेची सिद्धता करत होते. या वेळी मोठा स्फोट झाला.