कराचीमध्ये दातांच्या चिकित्सालयातील गोळीबारात १ चिनी ठार, तर ३ चिनी नागरिक घायाळ !

कराची (पाकिस्तान) – येथे दाताच्या चिकित्सालयात एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात चिनी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य ३ चिनी नागरिक गंभीररित्या घायाळ झाले. या घटनेचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही. गोळीबार करणारी व्यक्ती येथे रुग्ण म्हणून गेली होती. या चिकित्सालयाचे डॉ. रिचर्ड हू, त्यांची पत्नी फेन टेपिन आणि कर्मचारी रोनाल्ड यांच्यावर त्याने गोळीबार केला. या वेळी रेमंड चाऊ तेथे पोचल्यावर त्याच्यावरही गोळीबार केला. त्यानंतर मारेकरी पळून गेला. या गोळीबारात रोनाल्ड यांचा मृत्यू झाला.