मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवर पूर्वेकडे असणारी मीना मशीद हटवावी !  

मथुरेतील दिवाणी न्यायालयात याचिका

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील मीना मशिदी तिच्या मूळ जागेवरून हटवण्यात यावी, यासाठी येथील दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, ही मशीद केशव देव मंदिराच्या जागेवर बांधण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या २६ ऑक्टोबरला सुनावणी करण्यात येणार आहे. याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता दीपक शर्मा यांनी सांगितले की, आम्ही न्यायालयाला वास्तविक माहिती घेण्यासाठी मशिदीत एका अधिकार्‍याला पाठवण्याची विनंती केली आहे.

याचिकेमध्ये म्हटले आहे की, मोगल बादशाह औरंगजेब याने श्रीकृष्णजन्मभूमीवरील मंदिर पाडून तेथे शाही ईदगाह मशीद उभी केली. त्यानंतर औरंगजेबच्या वंशजांनी मंदिराच्या पूर्वीकडे मीना मशीद बांधली. ही मशीद या जागेवरून हटवण्यात यावी.