कर्णावती (गुजरात) – येथे बांधकाम चालू असणार्या इमारतीचे उद्वाहन (लिफ्ट) कोसळून झालेल्या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ९व्या मजल्यावर काम चालू असतांना कामगार उद्वाहनातून साहित्य वरच्या मजल्यावर नेत होते. या वेळी ७ व्या मजल्यावर पोचताच उद्वाहन कोसळले. त्यात एकूण ८ कामगार होते.