श्री दुर्गापूजेच्या निमित्ताने कोलकातामध्ये ‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवर पूजामंडप उभारणार

‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवरील पूजामंडप

कोलकाता – बंगालमध्ये दुर्गापूजेची सिद्धता चालू झाली आहे. शहरात नवरात्रोत्सव मंडळांनी पूजामंडप उभारणे चालू केले आहे. प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवर पूजामंडपाची सजावट करणार्‍या ‘श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब’ने या वर्षी ‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवर मंडपाची सजावट करणार असल्याचे घोषित केले आहे. गेल्या वर्षी त्यांनी दुबईच्या ‘बुर्ज खलिफा’च्या धर्तीवर भव्य मंडप उभारला होता. त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. ‘व्हॅटिकन सिटी’ हे इटली देशातील रोममधील एक लहान शहर आहे. ते रोमन कॅथोलिक चर्चचे मुख्य केंद्र आहे.

‘श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब’ला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सजावटीसाठी त्यांनी ‘व्हॅटिकन सिटी’ हा विषय निवडला आहे. राज्याचे अग्नीशमन मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार सुजित बसू हे श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबच्या पूजा समितीच्या आयोजकांमध्ये आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या देवतांचा पूजामंडप सजवण्यासाठी ख्रिस्त्यांच्या चर्चच्या शहराचा देखावा ठेवणारे धर्माभिमानशून्य हिंदू ! बंगालमध्येच देवीची अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आहेत, त्यांचा देखावा उभारला, तर हिंदूंना त्यांची माहिती तरी मिळेल !
  • अन्य पंथीय कधी तरी स्वतःच्या सणाच्या वेळी इतर पंथियांच्या श्रद्धास्थानांचे उदात्तीकरण करतात का ?