राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद
गेल्या ३ दिवसांपासून पाऊस अल्प झाल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे १३ ऑगस्टला रात्री बंद झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फूट १० इंच इतकी नोंदवली गेली. आलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी अल्प होईल.
खातेवाटप घोषित, मुख्यमंत्र्यांकडे १४, तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खात्यांचे दायित्व !
महाराष्ट्रातील राज्यशासनाचे खातेवाटप १४ ऑगस्ट या दिवशी घोषित करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ८ खात्यांचे दायित्व असणार आहे.
सुराज्याकडे वाटचाल करूया !
आध्यात्मिक बैठकीमुळे भारतात लाखो वर्षे प्रगल्भ संस्कृती, आचार-विचार टिकून राहिले आहेत. भविष्यवेत्त्यांच्या सांगण्यानुसार येत्या काळात भारत एक बलशाली, आत्मनिर्भर आणि संपन्न देश म्हणून निश्चितपणे नावारूपाला येईल. आवश्यकता आहे ती आध्यात्मिकतेच्या दिशेने पावले उचलण्याची !
नागपूर येथे मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वडिलांना अटक !
आरोपी हा पत्नी आणि १० वर्षांचा मुलगा अन् मुलगी यांसह रहातो. तो काहीही कामधंदा करत नसून त्याची पत्नी शेतमजुरी करते. वडिलांना मद्याचे व्यसन आहे. मुलीवर अत्याचार केल्याची वाच्यता केल्यास आईसह जिवे मारण्याची धमकी वडिलांनी मुलीला दिली होती. त्यामुळे मुलगी गप्प बसली.
चिंचवड (पुणे) येथे ३०० क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन !
या उपक्रमाअंतर्गत वर्ष १८५७ ते १९४७ पर्यंतची चित्रफीत आणि स्वातंत्र्याच्या काळात बलीदान दिलेल्या क्रांतीकारकांची चित्रफीत दाखवली जात आहे. हे प्रदर्शन १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व नागरिकांसाठी चालू असणार आहे.
भारताने श्रीलंकेला साहाय्य करू नये !
भारताने केलेल्या प्रखर विरोधानंतरही श्रीलंकेने चीनच्या हेरगिरी करणार्या ‘युआन वांग ५’ या युद्धनौकेला त्याच्या हंबनटोटा बंदरात येण्याची अनुमती दिली आहे. १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ही नौका या बंदरात येणार आहे.
वैभवशाली राष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना स्पष्ट करणारी यजुर्वेदातील प्रार्थना !
यजुर्वेदामध्ये देशाच्या पराधीनतेवरील उपाय दिलेला आहे. त्यामध्ये खर्या अर्थाने वैभवशाली राष्ट्र निर्माण व्हावे, याकरता प्रार्थना करण्यात आली असून तशी परिस्थिती भारतात त्या वेळी होती.
मध्यप्रदेश येथील मंदिरांत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन !
मध्यप्रदेशातील उज्जैन आणि मंदसौर येथील २ प्रसिद्ध मंदिरांमध्ये स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय उत्सव तिथीनुसार साजरा केला जातो. ही परंपरा ४५ वर्षे जुनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला हा अनोख्या स्वरूपातील उत्सव गतवर्षीही मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
लोकशाहीचे मंथन : उत्तम प्रजा आणि आदर्श राजा कधी मिळेल ?
आज भारत स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त प्रत्येक नागरिकाने ‘लोकशाही’ हा पाया असणार्या भारताविषयी विचारमंथन करायला हवे.