भारताची उल्लेखनीय वाटचाल !

भारताने गत ७५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. भारताची यातून आत्मनिर्भरता आणि स्वदेशी यांच्याकडे वेगाने वाटचाल होत आहे. त्याचा घेतलेला संक्षिप्त मागोवा…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७

अमृत महोत्सवी भारताचे सिंहावलोकन !

अनेक प्रश्न अनुत्तरित ! भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने या समस्या समूळ नाहीशा करून भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारत एक जागतिक महाशक्ती, समृद्ध आणि संपन्न देश अन् सुराज्य साकार झालेले राष्ट्र करण्याचा दृढनिश्चय करूया !

‘हर घर तिरंगा’ अभियानानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देऊ नका !

ध्वजसंहितेत दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करून राष्ट्रकर्तव्य निभावावे.

भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !

देश स्वतंत्र झाला, तो दिवस होता ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्ट’ असल्याचे म्हटले जाते. भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन ‘१५ ऑगस्ट’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ला साजरा करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे राष्ट्राविषयी विचार !

‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’