कोल्हापूर, १४ ऑगस्ट (वार्ता.) – गेल्या ३ दिवसांपासून पाऊस अल्प झाल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे १३ ऑगस्टला रात्री बंद झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फूट १० इंच इतकी नोंदवली गेली. आलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी अल्प होईल. आलमट्टीतून २ लाख २५ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येत आहे. वारणा धरणातून सध्या ५ सहस्र ५०० घनफूट प्रतिसेकंद, तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून ११ सहस्र ९५७ घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. सांगली येथे कृष्णा नदीची पातळी २८ फूट ६ इंच इतकी नोंदवली गेली.