‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर दंडात्मक कारवाई करणार

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून यासाठी कारावासही भोगावा लागू शकतो, अशी माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली आहे.

गोव्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात घेण्यासाठी लिखाण सिद्ध नाही !

गोव्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट होण्यासाठी लवकरात लवकर कृती होणे गोमंतकियांना अपेक्षित आहे !

रात्री घडणारे ९५ टक्के अपघात मद्यपान करून वाहन चालवल्याने होतात ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

रात्रीच्या वेळी झालेले ९५ टक्के अपघात मद्यपान करून वाहन चालवल्याने झाले आहेत. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची सरकारची सिद्धता असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

देव सर्वकाही देईल ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीसंबंधी थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’

सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस मुख्य न्यायमूर्तींचा नकार !

याचिकाकर्ते मुंबईचे निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी त्यांच्याविरोधात सरन्यायाधिशांकडे तक्रार केल्याने ते हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना दुसर्‍या खंडपिठाकडे दाद मागण्याचे निर्देश दीपांकर दत्ता यांनी या प्रकरणात दिले आहेत.

(म्हणे) ‘आम्ही मुसलमान असल्याने पोलीस आम्हाला फसवत आहेत !’

अशा विधानांमुळेच भारतविरोधी शक्तींना ‘भारत मुसलमानविरोधी आहे’, असे म्हणण्यासाठी आयते कोलीत मिळते. त्यामुळे आता शफीकच्या वडिलांवरही कारवाई व्हायला हवी !

मुंब्रा (जिल्हा ठाणे) येथील ‘मलिक रेसिडेन्सी’ इमारतीत १७ विद्युत् मीटरमध्ये छेडछाड !

मुसलमानबहुल भागातून एवढे दिवस वीजचोरी होत असतांना कुणाच्याच लक्षात कसे आले नाही ?

केतकी चितळे यांच्यावरील गुन्हे मागे घ्या ! – अजयसिंह सेंगर, करणी सेना प्रमुख, महाराष्ट्र

करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी ‘मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर लावलेला ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा रहित करावा’, अशी मागणी करणारे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.