केतकी चितळे यांच्यावरील गुन्हे मागे घ्या ! – अजयसिंह सेंगर, करणी सेना प्रमुख, महाराष्ट्र

करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी ‘मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर लावलेला ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा रहित करावा’, अशी मागणी करणारे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

नवी मुंबई विमानतळासाठी धोकादायक असणार्‍या दर्ग्यावर कारवाई करावी !

अनधिकृत दर्गा राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांना दिसतो, तर सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाच्या ते का लक्षात येत नाही ? हे संबंधित यंत्रणेचे अपयश म्हणायचे कि अकार्यक्षमता ?

छत्रपती संभाजीराजे यांची गड-दुर्गांच्या दुरवस्थेविषयी पुरातत्व विभागाशी चर्चा !

छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती यांची देहली येथील पुरातत्व विभागाच्या मुख्यालयात भेट घेतली. राज्यातील पन्हाळगड, विजयदुर्ग अशा महत्त्वाच्या गडांवर वारंवार तटबंदी कोसळणे, बुरुज ढासळणे असे प्रकार होत आहेत. रायगडावरही वीज व्यवस्था, ‘रोप-वे’ यांसह अन्य काही अडचणी आहेत.

गोवंडी (मुंबई) येथे एकाच घरात आढळले ४ मृतदेह !

गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरातील एकाच घरात ४ जणांचे मृतदेह आढळले आहेत. यामध्ये शकील खान, रजिया या पती-पत्नी यांसह २ अल्पवयीन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे.

पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २९ जुलै या दिवशी नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या आहेत.

अंधेरी येथे चित्रपटाच्या सेटला आग !

अंधेरी पश्चिम भागातील चित्रकूट मैदान येथे उभारलेल्या चित्रपटाच्या सेटला २९ जुलै या दिवशी भीषण आग लागली. अग्नीशमनदलाच्या १० गाड्यांनी आग विझवली.  सेटचे काम चालू असल्याने अनेक कामगार आत अडकल्याचा अंदाज आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेने मागितले मार्गदर्शन !

पीओपीची मूर्ती विरघळण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट नागरिकांना विनामूल्य दिले जात होते; मात्र ‘या वर्षी ते खरेदी करणार नाही’, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय !

शैक्षणिक पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी महापालिका ३ वर्षांची वैज्ञानिक मासिकाची वर्गणी भरणार आहे.

आजचे विद्यार्थी उद्याचे गुन्हेगार ?

उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील ५ प्रसिद्ध शाळांमधील २०० विद्यार्थ्यांनी ‘तांडव’, ‘माया’ आणि ‘अमर’ या नावांनी टोळ्या (‘गँग’) स्थापन केल्या आहेत. या टोळ्यांनी काही दिवसांपूर्वी देशी बाँबचे अनेक स्फोट घडवून आणले होते.

समाज सुसंस्कारित व्हावा !

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी उद्युक्त करणारा विज्ञापनाचा फ्लेक्स लावल्याच्या प्रकरणी पुणे येथील देवीप्रसाद शेट्टी या उपाहारगृह मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ व्यवसायाची विक्री वाढावी; म्हणून तरुण पिढीला व्यसन लावणार्‍यांची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे यातून अधोरेखित होते.