(म्हणे) ‘आम्ही मुसलमान असल्याने पोलीस आम्हाला फसवत आहेत !’

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा आरोपी शफीक याच्या वडिलांचा आरोप

प्रवीण नेट्टारू

बेंगळुरू – कर्नाटकातील भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे अन्वेषण चालू असून २८ जुलै या दिवशी या प्रकरणी शफीक बेळ्ळारे आणि जाकिर सावानुरू यांना अटक करण्यात आली.

जाकिर आणि शफीक

शफीक याचे वडील इब्राहिम यांनी, ‘मी प्रवीण यांच्या दुकानात आधी काम करत होतो. तेव्हा प्रवीण आणि शफीक यांची मैत्री होती. प्रवीण माझ्या घरी येत-जात असे. आम्ही मुसलमान असल्यानेच शफीकला अटक करून पोलीस त्याला फसवत आहेत’, असा आरोप केला आहे.

दुसरीकडे शफीक याच्या पत्नीने ‘शफीक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) कार्याशी जोडला आहे; परंतु प्रवीण यांच्या हत्येविषयी त्याला काही ठाऊक नाही’, असे सांगितले. शफीक याचे सुळ्या क्षेत्रामध्ये सुपारीचे दुकान आहे, तर जाकिर हा पुत्तुरूच्या सवनूर येथे खाद्यपदार्थांचे दुकान चालवतो. पोलिसांनी प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या संबंधी आतापर्यंत २१ जणांना कह्यात घेतले आहे. हे सर्व जण ‘पी.एफ्.आय.’ आणि त्याची राजकीय संघटना ‘एस्.डी.पी.आय.’ (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) यांच्याशी संबंधित आहेत, असे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका 

अशा विधानांमुळेच भारतविरोधी शक्तींना ‘भारत मुसलमानविरोधी आहे’, असे म्हणण्यासाठी आयते कोलीत मिळते. त्यामुळे आता शफीकच्या वडिलांवरही कारवाई व्हायला हवी !