देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण

नवी देहली – देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ दिवसांत ७० सहस्र २६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या ९१ सहस्र ६१ वर पोचली आहे.