पाटलीपुत्र (बिहार) – दक्षता विभागाने येथील औषध निरीक्षक जितेंद्र कुमार यांच्या घरावर धाड टाकून ४ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. एकूण ४ ठिकाणी एकत्रित धाडी टाकण्यात आल्या होत्या. यात नोटांनी भरलेली ५ पोती, भूमीची अनेक कागदपत्रे, सोन्या-चांदीचे दागिने आणि ४ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या.
सोना-चांदी, करोड़ों रुपए से भर गए बोरे, ड्रग्स इंस्पेक्टर के घर पर छापा#Bihar #BiharNews #Crime #DrugInspector #JitendraKumar #Patna #ATDigital #ATVertical pic.twitter.com/rGQpu2HY2Z
— AajTak (@aajtak) June 26, 2022
दक्षता विभागाने जितेंद्र कुमार यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. न्यायालयाकडून धाड टाकण्याची अनुमती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी उपअधीक्षक सुरेंद्र कुमार मौर यांनी सांगितले की, जितेंद्र कुमार यांनी सरकारी नोकरी करतांना मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात वारंवार तक्रारी येत होत्या.
संपादकीय भूमिकाएका औषध निरीक्षकाकडे इतकी रोकड सापडते, तर राजकारण्यांकडे किती रोकड सापडेल ? |