१६ बंडखोर आमदारांचे निलंबन होणार ! – खासदार अरविंद सावंत

शिवसेनेचे लोकसभेतील खासदार अरविंद सावंत

मुंबई – मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीविषयी कायदेशीर सल्ला घेतला असून लवकरच १६ बंडखोर आमदारांचे निलंबन होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले आहे. दोन तृतीयांश आमदारांमुळे निलंबन होत नाही, हे चुकीचे आहे. दुसर्‍या पक्षात विलीन होत नाही, तोपर्यंत निलंबन कायदा लागू असतो. त्यामुळे निलंबन नोटिशीला बंडखोर आमदारांना उत्तर द्यावे लागेल. विधानसभेच्या उपाध्यक्षांना कारवाईचे संपूर्ण अधिकार आहेत, असे शिवसेनेच्या वतीने अधिवक्ता देवदत्त कामत यांनी स्पष्ट केले.