मुंबई – अभिनेते शाहरुख खान यांचा ‘मन्नत’ हा बंगला सरकारी भूमीवर असून वर्ष १९८१ मध्येच त्याचा करार संपला आहे आणि तो पुन्हा करण्यात आलेला नाही, असा आरोप संभाजीनगर येथील कन्नड मतदारसंघातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
(सौजन्य : My Mahanagar)
‘सरकारने शेकडो एकर भूमी अत्यल्प दराने भाड्याने दिल्याने मोठ्या प्रमाणात भूमीचे भाडे घेणे बंद आहे. महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. या पार्श्वभूमीवर ही गोष्ट गंभीर असल्याने या संदर्भात २१ जून या दिवशी माध्यमांशी बोलणार आहे’, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.