आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामुळे पोटशूळ !
मडगाव, २० जून (वार्ता.) – रामनाथी, फोंडा येथे झालेल्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात राज्यघटनेतून ‘पंथनिरपेक्ष’ (सेक्युलर) आणि ‘समाजवादी’ (सोशालिस्ट) शब्द वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी देशद्रोही आणि घटनाविरोधी आहे. सरकारने अधिवेशनाच्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी आतंकवादाशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ.आय.’च्या) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मडगाव येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
‘पी.एफ.आय.’चे पदाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी ‘पी.एफ.आय.’ कार्य करते. आपली राज्यघटना ही ‘पंथनिरपेक्ष’ (सेक्युलर) आहे आणि येथील सामाजिक सौहार्दता टिकवून ठेवणे हे प्रत्येकाचे दायित्व आहे. रामनाथी, फोंडा येथे गेल्या १० वर्षांपासून अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन केले जाते आणि प्रत्येक वेळी निरनिराळ्या मागण्या या ठिकाणी केल्या जातात. अशा अधिवेशनाला सरकार का प्रोत्साहन देते ? सरकारने येथील कायदा आणि सुव्यवस्था टिकवली पाहिजे.’’
संपादकीय भूमिकाश्रीरामजन्मभूमीविषयी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य न करता ‘बाबरी पुन्हा उभारणार’, असा ६ डिसेंबरला सार्वजनिक प्रसार करणाऱ्या ‘पी.एफ.आय.’ने हिंदूंना घटनाविरोधी म्हणणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या… ! गोव्यातील मुसलमानांनी या संघटनेपासून ४ हात लांबच रहाणे श्रेयस्कर ! |