पुणे येथे ‘वारकरी धारकरी संगम सोहळ्या’चे आयोजन !

पुणे – येथील जंगली महाराज मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २२ जून या दिवशी दुपारी २ वाजता ‘भक्ती गंगा शक्ती गंगा संगमसोहळा’ म्हणजेच ‘वारकरी धारकरी संगम सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री शिवछत्रपती आणि संभाजी महाराज हे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनाला जात. श्री शिवछत्रपती आणि संभाजी महाराज असेपर्यंत चालू असणारी ही परंपरा खंडित झाली होती; पण श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि शिवपाईक यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आई श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मागील ७ वर्षांपासून ही परंपरा पुन्हा चालू केली आहे. लाखो धारकरी प्रत्येक वर्षी तोच आशीर्वाद घेण्यासाठी जातात.