साधकांना भरभरून चैतन्य देणाऱ्या ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ (छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड ५) या सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि उजवीकडे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

रामनाथी (गोवा) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे दिव्य जीवनचरित्र उलगडणारा सनातनचा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन (छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड ५)’ या छायाचित्रमय ग्रंथाचे प्रकाशन २५ मे या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या शुभहस्ते भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. या ग्रंथात परात्पर गुरु डॉक्टरांची अहंशून्यता, प्रीती, द्रष्टेपण इत्यादी व्यष्टी आणि समष्टी गुण, तसेच त्यांची वैशिष्ट्ये, समाजातील संतांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील प्रीती अन् त्यांच्याप्रतीचा भाव, परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात महर्षींच्या आज्ञेने साजरे करण्यात आलेले विविध सोहळे, रामनाथी आश्रमातील चैतन्यदायी स्थाने आणि आश्रमात झालेले बुद्धीअगम्य पालट इत्यादींचे छायाचित्रमय विवेचन करण्यात आले आहे.

भरभरून आनंद आणि चैतन्य देणाऱ्या या ग्रंथाचे प्रकाशन झाल्यामुळे साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य आठवणींचा अमूल्य ठेवाच उपलब्ध झाला आहे.