|

कोल्हापूर, ३० मे – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांचा ताफा भाऊसिंगजी रस्त्यावर पोचला असता चौकात अनेक गाड्यांमुळे वाहनकोंडी झाली होती. त्या वेळी एका पोलिसाने त्याच रस्त्यावर असणाऱ्या एका वाहनचालकाच्या कानशिलात लगावली. या घटनेची ध्वनीचित्रफीतही सामाजिक माध्यमांवर फिरत आहे. वाहनचालकाला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात आता संताप व्यक्त केला जात असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. (वाहनकोंडीसाठी थेट सर्वसामान्य माणसावर हात उचलणे, हा पोलिसांचा उद्दामपणा झाला. परिस्थिती समजून न घेता पोलीस जनतेशी अशा प्रकारे अरेरावी करत असतील, तर पोलिसांचा जनतेला कधीतरी आधार वाटेल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक)
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !