
कोल्हापूर, ५ मे (वार्ता.) – श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिदिन सहस्रो भाविक ‘ऑनलाईन’ अभिषेक देणगीची नोंद करतात. त्यांना कृपाप्रसाद पाठवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि भारतीय टपाल विभाग यांचे अधिकृत ‘प्रसाद पोस्टकार्ड’ पाकीट सिद्ध करण्यात आले असून भारतात, तसेच जगभरात कुठेही भाविकाला प्रसाद पोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाकिटासाठी अतिरिक्त तिकीट लावण्याची आवश्यकता नाही. लवकरच सर्व भक्तांना या माध्यमातून प्रसाद पोचवण्याची सिद्धता देवस्थान समिती करत आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी पत्रकारांना दिली.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !