नागपूर – येथे १७ वर्षांच्या मुलीवर अंगारे-धुपारे देऊन पूजा करण्याच्या नावाखाली ३ मे या दिवशी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी २ भोंदूबाबांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर कोल्हे आणि युवराज सोनटक्के अशी त्यांची नावे आहेत.
१. पीडित मुलगी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला भोंदूबाबा मनोहर कोल्हे यांच्या घरी नेले. या वेळी मुलीचा मामाही समवेत होता.
२. तेथे मनोहर कोल्हे अंगारे-धुपारे देऊन अनेक मुलींची पूजा करत होते. त्यांनी ‘मुलीवर देवाची अवकृपा झाल्याने तिची रात्रभर पूजा करावी लागेल’, असे सांगितले.
३. रात्री ९.३० वाजता मनोहर कोल्हे यांनी मुलीला घरात नेले. त्या वेळी पुजारी युवराज हाही घरात घुसला. दोघेही मुलीवर अत्याचार करत असतांना तिच्या मामाने हा प्रकार पाहिला. मामांना पाहून दोघे भोंदूबाबा पळून गेले.
४. मामाने सावनेर पोलीस ठाण्यात भोंदूबाबांच्या विरोधात तक्रार केली. २ भोंदूबाबांनी आतापर्यंत अनेक अल्पवयीन मुलींची पूजा करण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केले होते. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकासमाजात ९८ टक्के भोंदू आणि २ टक्के खरे संत आहेत. धर्मशिक्षणाअभावी भोंदू लोक ओळखता येत नसल्याने अनेक हिंदू त्यात फसतात आणि काहींना अत्याचारांना सामोरे जावे लागते. ही स्थिती टाळण्यासाठी आणि खरे संत ओळखता येण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य ठरेल ! |
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात निर्माण होणार ‘हेरिटेज वाडी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भूमीची पहाणी
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !
श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे पुलाच्या कामासाठी केले जात असलेल्या अवैध सुरुंग स्फोटांमुळे मंदिराला धोका !
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती