हिंसेवरून राजकारण करणार्‍यांना उघडे पाडा !

देशभरात हिंसेवरून राजकारण करणार्‍यांना उघडे पाडले पाहिजे, अशी मागणी देशातील ८ माजी न्यायाधीश, ९७ निवृत्त अधिकारी आणि सुरक्षादलांतील ९२ माजी अधिकारी यांच्यासह एकूण १९७ मान्यवरांनी पंतप्रधान मोदी यांनी खुले पत्र लिहून केली.

… अन्यथा ४ मेपासून हनुमान चालिसा दुप्पट आवाजाने लावणारच !

महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत, तशी माझी इच्छाही नाही; पण ३ मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली जाईलच.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट

‘‘या भेटीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खाण, पर्यटन, मोपा विमानतळ आणि महामार्गाचे बांधकाम या विषयांवर चर्चा केली. गोवा राज्य देशाची पर्यटन राजधानी बनवण्यासाठी केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता आहे. खाणी चालू करण्यास अनुमती मिळाल्यानंतर लवकरच खाणींची निविदा काढण्यात येणार आहे.’’

मांद्रे येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको ! – जीत आरोलकर, आमदार, मगोप

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार जीत आरोलकर यांनी ही भूमिका घेतली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर सनातन प्रभातमध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’

हिंसाचाराच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या महिला नेत्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हिंसाचार करणार्‍यांवर अशी कारवाई होणे आवश्यक !

उत्तराखंडच्या नैनितालमध्ये पडताळणीत सापडले १ सहस्र ५४७ घुसखोर !

एवढ्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यात घुसखोरी होत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ?

महानगर गॅस लिमिटेडकडून सी.एन्.जी. गॅसच्या दरात वाढ !

सी.एन्.जी. गॅसच्या दरात महानगर गॅस लिमिटेडने प्रतिकिलो मागे ४ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सी.एन्.जी. गॅसच्या प्रतिकिलोसाठी ७६ रुपये मोजावे लागणार आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाकडून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची मालमत्ता जप्त !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर कारवाई केली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिन हिची ७ कोटी १२ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली. मनी लॉड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली आहे.

राखीव श्रेणीतील उमेदवार आता खुल्या श्रेणीतील जागांसाठी दावा करू शकतात ! – सर्वाेच्च न्यायालय

राखीव श्रेणीशी संबंधित उमेदवार आता खुल्या श्रेणीतील जागांसाठी दावा करू शकतात; मात्र गुणवत्तेमध्ये त्यांची योग्यता आणि स्थिती पहाणे आवश्यक आहे, असा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिला.