हल्द्वानी (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या सीमेवरील नैनिताल सीमेवर रोहिंग्या मुसलमान घुसखोर रहात असल्याची माहिती मिळाली आहे. याद्वारे चीन आणि नेपाळ सीमेवर जाणीवपूर्वक मुसलमानांची लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू असल्यामुळे याची चौकशी चालू करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्येक घरात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यास प्रारंभ केला आहे. यात १ सहस्र ५४७ जण संशयित रोहिंग्या घुसखोर आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाएका नैनिताल जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर सापडत असतील, तर संपूर्ण देशात किती घुसखोर असतील, याची कल्पनाच करता येत नाही ! एवढ्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यात घुसखोरी होत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? |