मुंबई – सी.एन्.जी. गॅसच्या दरात महानगर गॅस लिमिटेडने प्रतिकिलो मागे ४ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सी.एन्.जी. गॅसच्या प्रतिकिलोसाठी ७६ रुपये मोजावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेड हा मुंबई, ठाणे आणि परिसरात प्रमुख गॅस वितरक आहे. ही दरवाढ ३० एप्रिलच्या पहाटेपासून लागू झाली आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या पी.एन्.जी. गॅसच्या दरात कोणतीही दरवाढ केली नाही. नाशिकमध्ये सी.एन्.जी.चे दर प्रतिकिलो ८९ रुपये झाले आहेत.