महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतात ५ दिवस उष्णतेची भीषण लाट !
२८ एप्रिल या दिवशी हवामान विभागाने घोषित केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, देहली आणि राजस्थान या राज्यांत ५ दिवस उष्णतेची लाट राहील.
संघटना, पद यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
फरिदाबाद (हरियाणा) येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले ! फरिदाबाद (हरियाणा) – हिंदूंच्या प्रत्येक समस्या सोडवायला अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व समस्यांना मुळापासून नष्ट करायचे असेल, तर आपल्या संघटितपणे धर्मावर आधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य केले पाहिजे. जेव्हा आपण संघटना, पद, मानसन्मान यांच्या पलीकडे जाऊन कार्य करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याकडून राष्ट्र आणि धर्म … Read more
संभाजीनगर येथे १ मे या दिवशी राजसभा होणारच !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शहरातील बहुचर्चित सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांकडून सभेला अनुमती मिळाली असून आता राज ठाकरे यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार आहे.
बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये इफ्तार पार्टीच्या आयोजनावर बंदी घाला !
बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये इफ्तार पार्टी आयोजित केल्यानंतर परिसरातील भिंतीवर हिंदुविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या. हा राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार आणि राज्यपाल यांच्याकडे आमची मागणी आहे की, या घटनेची तात्काळ चौकशी करावी.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार !
आरोप निराधार असल्याचे खासदार शेवाळेंचे स्पष्टीकरण !
‘फोन टॅपिंग’ प्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट !
राज्यातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी कुलाबा पोलिसांनी २८ एप्रिल या दिवशी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
कोरेगाव भीमा घटनेत माझा कोणत्याही पक्षावर आरोप नाही ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
कोरेगाव भीमा येथे एकामागोमाग एक घडलेल्या घटनेविषयी मला वैयक्तिक कोणतेही ज्ञान अथवा माहिती नाही. या घटनेमागे कोणत्याही पक्षाचा ‘अजेंडा’ किंवा उद्देश याविषयी माझे आरोप नसल्याचे स्पष्टीकरण देत स्वत:च्या भूमिकेवरून घुमजाव केले.
भोंग्यांविषयी राष्ट्रीय धोरण निश्चित करावे ! – खासदार संजय राऊत, शिवसेना
महाराष्ट्रात जात आणि धर्म यांवरून राजकारण केले जात आहे. भोंग्यांविषयी केंद्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे. यासाठी भोग्यांविषयी राष्ट्रीय धोरण निश्चित करणे आवश्यक आहे