आरोप निराधार असल्याचे खासदार शेवाळेंचे स्पष्टीकरण !
मुंबई – शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नसून याविषयी अन्वेषण चालू आहे. राहुल शेवाळे यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. ‘माझ्यावरील आरोप निराधार आहेत. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने हा आरोप करण्यात आला आहे. मी निर्दाेष असून कुठल्याही अन्वेषणाला माझी सिद्धता आहे. या बोगस तक्रारीमागे कोण आहे, हे मी लवकरच उघड करीन’, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.