दंड रहित करण्याच्या मंत्रीमंडळाचा निर्णयाला किरीट सोमय्या यांचे न्यायालयात आव्हान !

ठाणे येथील विहंग गार्डन इमारतीमधील अनधिकृत बांधकामाप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या आस्थापनाला ठाणे महापालिकेने १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तो रहित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

नवनीत राणा यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

खासदार नवनीत राणा यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून त्यांची अपर्कीती केल्याप्रकरणी राजा पेठ पोलीस ठाण्यात २८ एप्रिल या दिवशी तक्रार करण्यात आली होती.

राज्यातील अनधिकृत भोंग्यांविषयी ८ वर्षांत १८ आदेश !

अनधिकृत भोंग्यांविषयी पोलीस प्रशासनाची उदासीनता !

संभाजीनगर येथील राज ठाकरे यांच्या सभेला २ सहस्र पोलिसांचा वेढा !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे या दिवशी होणाऱ्या बहुचर्चित सभेला २८ एप्रिलच्या रात्री ८ वाजता पोलिसांनी १५ अटींसह अनुमती दिली आहे. त्यासाठी आयुक्तालयात सकाळपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किमान ३ बैठका झाल्या.

इंधन आणि किराणा माल दरवाढीमुळे स्नेहभोजनाच्या दरात ४० टक्के वाढ !

इंधन दरवाढीसमवेतच खाद्यतेल, बासमती तांदूळ, भाजीपाला, मजुरी यांचे दर वाढल्याने कार्यालयातील स्नेहभोजनाचे दरही २५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. २ मासांपासून गॅस सिलेंडर, डिझेलसह इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.

भंडारा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांवर आक्रमण करणाऱ्या आरोपीसमवेत जेवणारे ३ पोलीस कर्मचारी निलंबित !

वाळू माफियासमवेत जेवतांना पोलिसांना काहीच कसे वाटत नाही ? गुन्हेगारांसमवेत पोलिसांचेच ‘जिव्हाळ्या’चे संबंध असतील, तर असे पोलीस वाळू माफियांवर कठोर कारवाई करतील का ? सरकारने अशा पोलिसांना निलंबित करण्याऐवजी बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर ३० एप्रिल या दिवशी सुनावणी होणार !

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामिनाच्या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात ३० एप्रिल या दिवशी दुपारी १२ वाजता सुनावणी होणार आहे. यापूर्वी त्यांच्या जामिनावर २९ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार होती.

नाशिक येथे राज्यातील १९८ शेतकऱ्यांचा २ मे या दिवशी पुरस्काराने गौरव !

२ मे या दिवशी येथील ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ येथे हा कार्यक्रम होणार असून त्यात १९८ शेतकऱ्यांना गौरवण्यात येणार आहे.

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ मेपर्यंत वाढ !

पोलीसदलातील स्थानांतराच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने देशमुख यांची कोठडी वाढवून मागितली आहे.